• Home
Wednesday, March 4, 2026
  • Login
crimefact.in
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport
No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport
No Result
View All Result
crimefact.in
No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

पतीपत्नीच्या वादात आकरा महिन्याच्या पुतण्याचा खून.

Crime Fact by Crime Fact
July 11, 2025
in Crime
0 0
0
0
SHARES
321
VIEWS

पती-पत्नीच्या वादातून आईने चुकून केल्या हल्ल्यात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

दौंड प्रतिनिधी –

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या घरगुती वादाचे परिणिती इतके गंभीर झाले की, एका निष्पाप ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. केडगाव-आंबेगाव परिसरातील पुनर्वसन येथे वास्तव्यास असलेल्या नितीन मेंगावडे आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी पल्लवीची जाऊ (भावजय) भाग्यश्री मेंगावडे आपल्या ११ महिन्यांच्या बाळासह तिथे आली होती. या चिमुकल्याचं नाव अवधूत मेंगावडे असं आहे.

वाद विकोपाला गेल्यावर संतप्त झालेल्या पल्लवीने देवीसमोरील त्रिशूळ उचलून नितीनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ला चुकून झाला आणि त्रिशूळ थेट भाग्यश्रीच्या कुशीत असलेल्या चिमुकल्या अवधूतच्या छातीत घुसला. त्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तत्काळ जखमी अवस्थेत अवधूतला केडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला लोणी येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अवधूत हा भाग्यश्रीचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मुलींपाठोपाठ जन्माला आलेला एकमेव मुलगा असल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर भाग्यश्री मेंगावडे यांच्या फिर्यादीवरून पल्लवी आणि नितीन मेंगावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

Tags: CrimeCrime factCrime factsCrime NeswCrime newsCrimestorydaund crime casegst frod

Related Posts

Crime

“18महिन्यात दामदुप्पट”रेशन दुकानदाराने आणली योजना, आजी माजी अधिकाऱ्यांसह अनेक शेतकरी देशोधडीला. दलाल गिर्हाईक बनविण्याचे स्पर्धेत “विजय”मिळवून मोकळा.

December 27, 2025
Crime

आधी मुलीची छेड काढली, मग जाब विचारणाऱ्या आईवडिलांना मारहाण केली. जय जरांगे याच्यावर बारामतीत गुन्हा दाखल.

December 3, 2025
Crime

1800 कोटींची जमीन 300कोटीला मिळतेय या अमिषाला बळी पडून पार्थ पवार फसले. या व्यवहारत रोखीने कोट्यावधींचा ॲडव्हान्स घेऊन बंटी बबली फरार.

November 9, 2025
Crime

आधी लग्न झालेलं असताना परत दुसरं लग्न, तीन महिलांसह चार एजंट ची टोळी,लग्नाळू तरुणाला  लाखोंचा गंडा घातला. बारामतीत तालुक्यातील प्रकार, फसवणूक झालेल्या तरुणाची पोलिसात धाव!

August 22, 2025
Crime

बनावट GST घोटाळ्यानंतर निलेश कोरटकरचा बनावट गाडी नंबर घोटाळा उघड वालचंदनगर पोलिसांची बोटचेपी भूमिका?

July 12, 2025
Crime

इंदापूरात GST चं गौडबंगाल ‘कोरटकरने’  बोगस कागदपत्रांचा वापर करून, सरकारला कोट्यावधी रुपयांना चुना लावला, अडाणी शेतकरी विद्यार्थी यांच्या नावावर उघडल्या बोगस कंपन्या.

July 11, 2025

Archives

  • December 2025
  • November 2025
  • August 2025
  • July 2025

Categories

  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

© 2025

No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In